38)चांगले-वाईट, उपकारक-अपकारक हे मुळातच परिस्थितीसापेक्ष असल्याने व हिंदू समाजाला वेळोवेळी निरनिराळया परिस्थतीतून जावे लागले असल्याने सकृतदर्शनी तरी अनेक परस्पर विरुध्द गोष्टींचा अदभुत संग्रह त्याचे ठिकाणी झाला आहे. त्या सर्वांमधून आजच्या परिस्थितीला योग्य अशा गोष्टींची निवड कशी करावी ? त्यासाठी निकष वा मानदंड कोणता लावावा ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-038.mp3

35)“न राज्यं नैव राजाšसीत” अशी समाजरचना कधी होती का ? ती पुन्हां दृष्टिपंथात आणता येईल का ? या पद्धतीत व साम्यवाद्यांच्या शासनमुक्त समाजव्यवस्थेत (स्टेटलेस सोसायटीत) कोणते अंतर आहे ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-035.mp3

34)श्रुतिस्मृतिवर अधारित असा हा आपला वैदिक धर्म आहे. पण स्मृतिकार अनेक असून त्यांनी कालानुरुप शास्त्रात, व्यवस्थेत बदल केले आहेत कां ? पुढेही हे हेाणे अभिप्रेत आहे का ? असे बदल शासनाने केले तर चालणार नाही का ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-034.mp3

32)संस्कृती व धर्म एकच का ? अंतर असल्यास कोणते ? संस्कति हा विचार व सभ्यता हा त्याचा प्रगट होणारा बाह्यचार हे म्हणणे योग्य आहे काय ? या दृष्टीने हिंदू संस्कृतिचे स्पष्टीकरण करता येईल का ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-032.mp3

31)आमची संस्कृती ही भोगप्रधान नसून त्यागप्रधान आहे. याचा अर्थ भौतिक प्रगति आणि विज्ञानाने मिळणारी सुखे आम्हाला नको आहेत असा अभिप्रेत आहे काय ? आपल्या संस्कृतिचा भौतिक सुखाशी विरोध आहे काय?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-031.mp3