संकेतस्थळ उद्दिष्टे

ॐ  श्री  卐 ll श्रीशंकर ll निर्मोह: संयमी योगी शान्तो दान्तो विमत्सर: |सोsस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती ||सुप्रसन्न: समाधानी निश्चयी च दृढव्रती |सोsस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती || सज्जन हो, सप्रेम जयहरि. प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा । शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥ सत्कर्माची प्रेरणा देणारे, अकर्म टाळण्याची सूचना देणारे, सत्याचा निर्देश करणारे, सन्मार्ग दाखविणारे, उत्तम शिक्षण देणारे व सुबोध करणारे - असे सहा जन मनुष्यासाठी गुरु समान असतात, अशा अर्थाचे एक शास्त्र वचन आहे. यातील एका गुणाने संपन्न असलेला गुरु लाभला तरी मनुष्याचे कल्याण होणे निश्चित आहे. नारदभक्तिसूत्र सांगते -मुख्यतस्तु महत्कृपयैवभगवत्कृपालेशाद्वा ॥ महत्सङ्गस्त् दुर्लभोऽगम्योऽमोघश्च । लभ्यतेऽपि तत्कृपयैव ॥अर्थातप्रेमभक्तीच्या प्राप्तिचे साधन मुख्यत: महापुरुषांच्या कृपेने अथवा भगवंताच्या लवमात्र त्कृपेने सद्भक्ताला प्राप्त होते. तथापि महापुरुषांचा सङ्ग दुर्लभ, अगम्य आणि अमोघ आहे. भगवंताच्या कृपेनेच महापुरुषांचा संश्रय प्राप्त होतो. विवेक चूडामणि यात नमूद केले आहे -दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रहहेतुकम् । मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रयः ॥अर्थातज्यामुळे भगवत्कृपा प्राप्त होते, तो मनुष्यजन्म, मुमुक्षुत्व (मुक्त […]

आजचे दर्शन

वरदवाणी

Calendar Day 21

क्षमा, शांति हे वैयक्तिक सद्गुण आहेत. व्यक्तिजीवनाचें ते आदर्श आहेत, हा व्यष्टिधर्म आहे. आपण हिंदू माणसे मात्र नेमके उलटे वागतो. सामाजिक पातळीवर, राष्ट्राच्या पातळीवर आपण सोशिक, शांत, उदार आहोत. हिंदू म्हणून आमच्यावर अनेक आपत्ती आल्या, आमचे न्याय्य अधिकारहि लुबाडले गेले, आमच्या देशाची छकलें उडाली, स्वार्थी उन्मत्तांनीं क्रूरपणें आपला लाभ करून घेतला, आणि तरी आम्हीं शांतच राहिलों. वैयक्तिक पातळीवर मात्र आमचा मत्सर जागृत असतो. आम्ही सूडबुद्धीने वागतो. बांधाच्यामुळे गेलेल्या वीतभर जागेसाठी न्यायालयांत भांडत बसतो. संत असे असत नाहींत. ते वैयक्तिक लाभहानीचा विचार करीत नाहींत. आणि म्हणूनच ते शांत आणि क्षमाशील राहण्यात आनंद अनुभवू शकतात. अगतिकपणे तडफडणारे स्वार्थी मन हें सुख मिळवू शकत नाहीं.

२१