ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंतराव आठवले) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्रीदासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे, विविध उपक्रम राबवित आहे. स्वामी वरदानंद भारती यांनी त्यांच्या कार्यकाळात सिद्धीस नेलेल्या अनेक उपक्रमांची पुनरावृत्ती करणे हा त्यातीलच एक भाग आहे. स्वामीजींनी पूर्ण केलेला व प्रतिष्ठानने हाती घेतलेला अजून एक मोठा उपक्रम म्हणजे “पंढरपूर ते सज्जनगड पदयात्रा”. दि. २७ जानेवारी २०१९ ते ०८ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान सदर पदयात्रा संपन्न होणार आहे. पदयात्रेसाठी नाव नोंदणी आवश्यक असून दि. १९/१२/२०१८ पर्यंत रु. ३५००/- शुल्क भरून आपण आपली नोंदणी करावी. जास्तीतजास्त साधकांनी या पुण्यकारक पर्वणीचा लाभ करून घ्यावा.

तसेच ज्या साधकांना या पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी होणे शक्य नाही त्यांनी एका पदयात्रीचे शुल्क भरून पदयात्रेस सहकार्य करावे, ही विनंती.

(१) पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी शनिवार, दि.२६/०१/२०१९ रोजी श्रीगजानन महाराज मठ, पंढरपूर, येथे सायंकाळी ०५ वाजेपर्यंत मुक्कामाला पोचावे.
(२) नेहमी लागणाऱ्या कपड्यांसोबत थंडीचे दिवस असल्याकारणाने भाविकांनी आवश्यक ते अंथरून-पांघरून, गरम कपडे, इ. सोबत ठेवावेत.
(३) आपापली औषधे, बॅटरी, बसावयाचे आसन, गळ्यातली लहान पिशवी, पाण्याची बाटली, वही-पेन, इ. सोबत ठेवावी.
(४) पदयात्रेत प्रतिदिनी श्रीदासबोधाचे पारायण होणार असल्याने प्रत्येकाने श्रीदासबोधाची प्रत सोबत ठेवावी.
(५) भावमुक्तावली, श्रीविष्णूसहस्रनाम व भजनावली ही पुस्तकेंहि सोबत ठेवावीत.
(६) पदयात्रींसाठी चहा-नाश्ता-जेवण, अंघोळीसाठी गरम पाणी, राहण्याची व्यवस्था, इ. सोयी पुरविण्यात येणार आहेत.
(७) एकूण १६४ किमी अंतर चालावयाचे असून १२ मुक्काम होणार आहेत.
(८) शुक्रवार, दि. ०८/०२/२०१९ रोजी सज्जनगडावर कालाकीर्तनाने पदयात्रेची सांगता होईल.
(९) पदयात्रेमधे सहभागी होणाऱ्या भाविकांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
(१०) पदयात्रे दरम्यान नित्य कार्यक्रम खालील प्रमाणे असेल :-
पहाटे ०५३० वाजता चहा
सकाळी ०६ वाजता प्रार्थना
सकाळी ०६३० वाजता पदयात्रा प्रस्थान
दुपारी ०१ ते ०४ भोजन व विश्रांती
दुपारी ०४ ते ०५ श्रीदासबोध पारायण
दुपारी ०५ ते ०५३० चहा
सांयकाळी ०५३० ते ०७ कीर्तन
सायंकाळी ०७३० ते ०८३० अल्पोपहार
रात्रौ ०८३० ते ०९ श्रीविष्णुसहस्रनाम

धरोनि पहा वेष तो मानवाचा l जगी जन्माला अंजनीबाळ साचा ll
जया शोभले नाम हे रामदास l नमस्कार माझा तयांच्या पदास ll
                                              – श्रीदासगणू महाराज.

=0=0=0=

ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐

ॐ सर्वेशां स्वस्तिर्भवतु ।
सर्वेशां शान्तिर्भवतु ।
सर्वेशां पुर्णंभवतु ।
सर्वेशां मङ्गलंभवतु ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐

 

ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

मागच्या वर्षीचा जयंती उत्सव श्रीदासगणू महाराजांचा १५० वा जयंती उत्सव होता. हा उत्सव पौष शु. दशमी ते द्वादशी शके १९३९ म्हणजेच दि. २८, २९ व ३० डिसेम्बर २०१७ या दरम्यान अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या उत्सवाची सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे click करा.