ॐ श्री 卐

ll श्रीशंकर ll

पूस्वामी वरदानंद भारती यांचा जीवनपट

अ. क्र. घटना शके इसवी सन वय*
१) श्रीसाईबाबांच्या सांगण्यानुसार श्री.दामू अण्णा यांचा सौ.राधा (पू. अप्पांचे पिता-माता) यांचेशी विवाह.  या विवाहास श्रीसाईबाबांची उपस्थिती होती १९१४
२) पुणे येथे अनंतचतुर्दशीला पू. अप्पांचा जन्म
भाद्रपद शु.१४, १८४२ २७/०९/१९२० प्रारंभ
३) ती. दामूअण्णांचे पंढरपुरात दुःखद निधन पौष शु.१०, १८४५ १९२४ ०४
४) मौंजी बंधन १८५० १९२८ ०८
५) कीर्तनाचा ओनामा १८५७ १९३६ १६
६) श्रीशालिवाहन काव्यलेखन प्रारंभ चैत्र व.११, १८६२ ०३/०५/१९४० २०
७) पंढरपूर येथे सौ.इंदिरा यांचेशी विवाह (गोरजमुहूर्त)
माघ व.८, १८६३ १९/०२/१९४१ २१
८) आयुर्विद्या विशारद १८६६ १९४४ २४
९) आयुर्विद्या पारंगत १८७२ १९५० ३०
१०) श्रीकृष्णकथामृत (महाकाव्य) प्रकाशन
श्रावण शु.३, १८७२ १६/०८/१९५० ३०
११) पुण्यातील टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयच्या प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारला निज ज्येष्ठ शु.३, १८८३ १६/०६/१९६१ ४१
१२) पंढरपुरात पू.दासगणू महाराजांचे निर्वाण कार्तिक व.१३, १८८४ २५/११/१९६२ ४२
१३) राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे त्यागपत्र चैत्र व.१०,१८८८ २५/०४/१९६६ ४६
१४) पू. दासगणू महाराजांचा जन्मशताब्दी महोत्सव पौष शु.०८ ते १२, १८८९ ७ ते १२/०१/१९६८ ४८
१५) गंगोत्री येथे श्रीवरद नारायण दर्शन
श्रावण व.११, १८९३ १६/०८/१९७१ ५१
१६) अनुग्रह देण्यास सुरुवात दासनवमी १८९४ २६/०२/१९७३ ५३
१७) गोरटे येथेश्रीदासगणू महाराज प्रतिष्ठान’ स्थापना
पौष, १८९६ १०/०१/१९७४ ५४
१८) प्रथम सिंधु स्नान भाद्रपद व.१, १८९८ ०९/०९/१९७६ ५६
१९) कैलास-मानस यात्रा भाद्रपद शु.७, १९०३ ०५/०९/१९८१ ६१
२०) ‘श्रीराधादामोदर प्रतिष्ठान’ स्थापना वैशाख व.११, १९०४ २९/०५/१९८२ ६२
२१) सपत्नीक चारधाम यात्रा सांगता श्रावण शु.१० ते अश्विन शु.१२, १९०८ १५/०८/१९८६ ते १४/१०/१९८६ ६६
२२) नांदेड स्मरण महोत्सव पौष शु.१४ ते व.९, १९०९ ०२ ते १२/०१/१९८८ ६८
२३) पुणे येथे मातोश्रींचे निर्वाण मार्गशीर्ष व.९, १९१२ १०/१२/१९९० ७०
२४) श्रीक्षेत्र उत्तरकाशी (उत्तराखंड) येथे संन्यास दीक्षा ग्रहण
चैत्र व.११, १९१३ १०/०४/१९९१ ७१
२५) श्रीक्षेत्र गोरटे समाधी मंदिर कलशारोहन वैशाख शु.१३, १९१५ ०४/०५/१९९३ ७३
२६) ‘संस्कृति विचार सेवक संघ’ स्थापना आषाढ शु.११, १९१७ १९९५ ७५
२७) ‘श्रीसंत विद्या प्रबोधिनी’ निर्मिती १९१९ १९९७ ७७
२८) दामोदराश्रम (पंढरपूर) जीर्णोद्धार वैशाख १९२१ ०५/०५/१९९९ ७९
२९) मनुस्मृति प्रकाशन पौष शु.११, १९२३ २५/०१/२००२ ८२
३०) उत्तरकाशी येथे महासमाधी प्रस्थान
श्रावण व.११, १९२४ ०३/०९/२००२ ८२
३१) उत्तरकाशी येथे महासमाधी सांगता श्रावण व.१३, १९२४ ०५/०९/२००२ ८२
३२) अनंतचतुर्दशीला गोरटे येथे षोडशीचा कार्यक्रम भाद्रपद शु.१४, १९२४ २०/०९/२००२ ८२
* पू. अप्पांचे संबंधित घटनेच्या वेळी असलेले वय सुलभ संदर्भासाठी येथे नोंदविले आहे.