दया दाखवावयाची म्हणजे सुखासीनतेचा त्याग करावा लागतो, विषयोपभोगाला आळा घालावा लागतो, स्वार्थाला मुरड घालावी लागते, कर्तव्य भावनेने, निष्काम बुद्धीनें, सहाय्याला धावावे लागतें. त्यासाठीं होणारे कष्ट सोसावे लागतात. हें असें असलें कीं मग त्या अंतःकरणात प्रेमभक्ति उत्पन्न होऊं शकते, ईश्वरनिष्ठेने ती वाढत जाते, आणि मग अशा प्रेमळ मनाला शांति मिळते, प्रसन्नता प्राप्त होते.