दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळा येतो कां? सर्व सोडून कोणत्याहि परिस्थितीत त्याच्या साह्यास जावे असे वाटतें कां? हा माझा, हा परका, हा शत्रू, हा मित्र. हा माझ्या उपयोगी पडला किंवा पुढें कधीं पडेल अशा भावनेने दया येते कां? सर्व ठिकाणीं, कोणताहि भेदाभेद न करतां, स्वभाव म्हणून, दया येते कां? याचा विचार केला पाहिजे.