संकेतस्थळ उद्दिष्टे

ॐ  श्री  卐 ll श्रीशंकर ll सज्जनहो, सप्रेम जयहरि. श्रीमद्सद्गुरू श्रीदासगणू महाराज प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळी आपले सहर्ष स्वागत. प्रतिष्ठानची ओळख व प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती आधुनिक तंत्रज्ञानाच्या या माध्यमातून करून देण्याच्या उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. आजच्या विज्ञान युगातील माणूस विज्ञानाच्या प्रगतीच्या बळावर निर्माण झालेल्या सुख प्रदान करणाऱ्या यंत्रांच्या व सुविधांच्या मोठ्या ढिगाऱ्यावर लोळतो आहे. मात्र तो माणूस समाधानाला, प्रेमाच्या ओलाव्याला व स्वाभाविक मन:शांतीला पारखा झाला आहे. संतांचे विचार व तद्नुरुप आचरण यामुळेच या अप्रिय परिस्थिती मध्ये पालट होऊ शकतो. भौतिक सुखाची माणसाला गरज नाही, नसावी असे मुळीच म्हणावयाचे नाही. तथापि भौतिक सुखाची जितकी गरज आहे तितकीच किंबहुना त्यापेक्षा अंतरिक समाधानाची मनुष्याला अधिक गरज असते. अत्यंत सामान्य परिस्थितीत जीवन कंठलेले परंतु आत्मिक समाधानाच्या सर्वोच्च पातळीवर विराजमान झालेले अनेक सत्पुरुष, संत, महात्मे आपण आपल्या भारतीय परंपरेमध्ये पाहिले आहेत व भविष्यातहि असे सत्पुरुष, संत, महात्मे जनसामान्यांसाठी आदर्श म्हणून उभे राहतील. पू. श्रीदासगणू महाराज (दादा) व पू. स्वामी वरदानंद भारती (अप्पा) हे दोघेहि या उज्वल व तेजस्वी भारतीय संत […]

आजचे दर्शन