नित्योपासनेत कोण काय करतो, हें महत्त्वाचें आहेच पण कसें करतो, किती करतो, याला त्याहूनहि अधिक महत्त्व आहे. करण्यामागें आवड, प्रेम, ‘अधिकस्य अधिकं फलं’ ही भावना असणें आवश्यक आहे. जें करणें तें मनापासून केलें पाहिजे, लक्ष लावून केलें पाहिजे, सावध राहून केलें पाहिजे, हें सगळे लक्षांत घेऊन करणें म्हणजेच एकनिष्ठेनें करणें आहे. आपण असे करतो कां? याचा विचार प्रत्येकानें करावा.