मन हेंच मनुष्याच्या प्रसन्नतेचे साधन आहे. तें सारखे भटकते, केव्हां निसटते तें कळत नाहीं. त्याला आवरावे लागतें, तें कसें? त्याचा एक मार्ग म्हणजे “दया सर्वभूती जया मानवाला.” सर्व भूतमात्रांच्या ठिकाणीं साधकाच्या अंतःकरणांत दयाभाव असला पाहिजे.