26)हिंदू धर्मामध्ये फक्त ब्राह्मणास मांस वर्ज्य का ? मांसाने बुध्दीला अडथळा येतो असे म्हणावे तर मांसभक्षक युरोपियन जगज्जेते आहेत. वेदाचे याबाबत काय सांगणे आहे ? व्यवहारात कसे वागावे ?

27)सहस्त्रावधि वर्षांच्या प्रक्रियांमधून हेाणारे परिणाम सोसत आलेला आपला अलिकडचा हिंदू समाज ज्या स्वरुपात दिसतो आहे, त्या स्वरुपात त्याने पुरातन श्रेष्ठ संस्कृतीचा वारसा सांगावा यात वैशिष्ट्य कोणते ?

28)हिंदूत्वाच्या स्वरुपासंबंधी अनेक कल्पना मांडण्यात येतात. तुमच्या मते हिंदुत्वाचे अधिष्ठान कोणत्या स्वरुपाचे असले पाहिजे ?

29)हिंदू धर्म हा वैश्विक धर्म कसा हेाऊ शकेल ? कारण त्यातच एकसंघपणा नाही.

30)सर्व चांगली वैशिष्टे असताना भारताला भौतिक पराभव का पत्कारावा लागला ?

31)आमची संस्कृती ही भोगप्रधान नसून त्यागप्रधान आहे. याचा अर्थ भौतिक प्रगति आणि विज्ञानाने मिळणारी सुखे आम्हाला नको आहेत असा अभिप्रेत आहे काय ? आपल्या संस्कृतिचा भौतिक सुखाशी विरोध आहे काय?

32)संस्कृती व धर्म एकच का ? अंतर असल्यास कोणते ? संस्कति हा विचार व सभ्यता हा त्याचा प्रगट होणारा बाह्यचार हे म्हणणे योग्य आहे काय ? या दृष्टीने हिंदू संस्कृतिचे स्पष्टीकरण करता येईल का ?

33)अध्यात्म वा सांस्कृतिक कार्य म्हणजे मग तेथे नियम व्यवस्था शिस्त बंधने आवष्यक नाहीत. तर गबाळेपणा ढिलाई असणेच दूष्ट असे चित्र बरोबर आहे का?

34)श्रुतिस्मृतिवर अधारित असा हा आपला वैदिक धर्म आहे. पण स्मृतिकार अनेक असून त्यांनी कालानुरुप शास्त्रात, व्यवस्थेत बदल केले आहेत कां ? पुढेही हे हेाणे अभिप्रेत आहे का ? असे बदल शासनाने केले तर चालणार नाही का ?

35)“न राज्यं नैव राजाšसीत” अशी समाजरचना कधी होती का ? ती पुन्हां दृष्टिपंथात आणता येईल का ? या पद्धतीत व साम्यवाद्यांच्या शासनमुक्त समाजव्यवस्थेत (स्टेटलेस सोसायटीत) कोणते अंतर आहे ?