16)विश्वनियंत्राक म्हणून परमेश्वराला मानलेच पाहिजे काय ? नास्तिक असण्याने विश्वाच्या व्यापारात काय बदल होणार आहे?

17)समुद्रोल्लंघण निषिद्ध परधर्मात गेला की तो बाटला, तो पुन्हा हिंदूधर्मात येऊ शकत नाही असे हिंदू तत्वज्ञ सांगतात ते योग्य आहे काय ?

18)सामाजिक कर्तव्याची पालन करण्याची प्रवृत्ति धर्मशिक्षणातून कशी निर्माण करता येईल ? समाजसेवा हीच ईश्वरसेवा ही निष्ठा ख्रिस्ती मिशनऱ्यांत आढळते, तेवढी हिंदूत आढळत नाही. असे का ?

19)सामाजिक कार्य वा उत्सव व महोस्तव यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी त्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तीने कसे वागावे ?

20)सर्वत्र समानता आणणे म्हणजे समाजवाद आणणे, याला हिदू तत्वज्ञानाचा विरोध आहे का ?

21)हिंदू धर्माची वैशिष्टे कोणती ? अन्य धर्माहून यांत वेगळेपण काय ? अन्य धर्माहून न्यूनता कोणती ? वा उठून दिसणारे दोष काणते ?

22)अन्य धर्म व हिंदू धर्म यांच्यातील फरकाचे नेमके मुद्दे कोणते ? हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व कशांत ? अन्य धर्मियांत अनेक सत्वशिल प्रामाणिक ध्येयनिष्ठ अशी माणसे आढळतातच ना !

23)कालगतीमुळे अथवा अन्य काही कारणांमुळे हिंदू समाजामध्ये कोणते दोष उत्पन्न झाले आहेत ? ते दूर करण्यासाठी काय व कसे प्रयत्न करावेत ?

24)आपल्या धर्मात वाईट असे काही आलेलेच नाही काय ?

25)तुमच्या एकूण विवेचनामध्ये सुधारकांविषयी व त्यांच्या विचारसरणीविषयी तुम्ही अत्यंत प्रतिकूल आहात असे जाणवते. ते योग्य आहे काय ?