96)आपल्या ग्रंथातील अदभूत गोष्टींचा घटनांचा वैज्ञानिक दृष्टिकोणातून अर्थ लावता येईल काय ?

97)वेदनिष्ठ, वेदप्रामाण्य मानणारी यज्ञप्रधान संस्कृति निर्मिणे आजच्या वैज्ञानिक जगात शक्य आहे का? विज्ञानाच्या कसोटीला हिंदू धर्म व संस्कृत टिकेल का?

98)सर्व काही पूर्वकर्मानुसार होते तर आपण आपले प्रारब्ध बदलू शकतो का?

99)प्रारब्ध व प्रयत्न यांचे व्यवहारात व परमार्थात स्थान कोणते?

100) मनुष्य म्हणजे केवळ शरीर नव्हे तर शरीर –मन-बुध्दि-आत्मा मिळून मनुष्य असे हिंदू तत्वज्ञान सांगते. पण शरीर लक्षात येते तसे इतरांचे नीट आकलन होत नाही. मग त्यांचे अस्तित्व का मनावयाचे ?

101) व्यक्तिीचा विकास व्यष्टी-समष्टी-सृष्टी-परमेष्ठी अशा टप्याने व्हावयाचा म्हणजे काय ? नराचा नारयण होणे म्हणजे ?

102) सगळे जगच जर मिथ्या आहे तर माणसाने चांगले होण्यासाठी खटपट का करावी ?

103) परोपकारादि सत्कृत्ये करणाऱ्या माणसांनी पूजापाठादि धार्मिक कृत्ये न केली तरी चालतील काय ?

104)अनेक प्रकारचे अन्याय होत असताना त्यांचा प्रतिकार कसा कराव ?

105)“आत्मानं सततं रक्षेत दारैारपि धनैरपि” हा उपदेश व्यवहारात आणण्याचा मार्ग कोणता ?