नाटकांत किंवा सर्कशीत अभिनय किंवा कसरत पुन्हां पुन्हां करीत रहावें लागते. गायकाला एकेक स्वर गळ्यांत बसावा म्हणून कित्येक दिवसपर्यंत त्याचा रियाज करावा लागतो. गणित करण्याची रीत समजली म्हणजे तेवढ्यानेंच भागत नाहीं, त्या जातीचीं निरनिराळीं उदाहरणें वारंवार सोडवावी लागतात. मनाला चांगले वळण लागून ते अंगवळणी पडण्याच्या प्रकरणीहिं तेंच करावें लागतें.