श्रवण, पूजा, स्तोत्रपठण, पोथीवाचन हे सर्व माणूस करतो पण बरें करीत नाहीं. अंत:करणांत खरी निष्ठा नसते, प्रेमादर नसतो. हा आपल्या उद्धाराचा मार्ग आहे हें मनापासून पूर्णपणे पटलेले नसतें. करतो ते गतानुगतिक म्हणून, नाहीं केलें तर पाप लागेल, संकटें भोगावी लागतील असें भय वाटतें म्हणून. या कृत्यामध्यें मन लागत नाहीं, बुद्धि स्थिरावत नाहीं; हात, डोळे, जीभ, यांची तेवढी हालचाल होत राहते.