भूतकाळावर माझे कोणतेहि नियंत्रण नाही, पण वर्तमानकाळ ही माझ्या स्वाधीनची गोष्ट आहे. त्यामुळे भविष्यकाळ मी माझ्या इच्छेप्रमाणे घडवू शकेन असा विश्वास कर्मविपाकाच्या सिद्धांतामुळे माणसाच्या अंगात बळावण्याची शक्यता आहे.