वेदान्त शास्त्राप्रमाणे संसार हा जर भ्रमात्मक आहे तर त्यांतील सुखदुःखें हीं सत्य असण्याची शक्यताच नाहीं. ती खरी आहेत असें मानून चालल्यामुळे तर मनुष्य त्या मोहांत गुंतून, नको तिथें, नको तसें, वागतो आणि मग त्याचें वागणें दुर्वर्तनाच्या, पातकाच्या पातळीवर उतरतें. यासाठी शास्त्रीय सत्याचा स्वीकार केला पाहिजे, कल्पनांचा त्याग केला पाहिजे.