मन फार चुकार आहे. पूजेला बसल्यावर वा डोळे मिटल्यावर त्याच्या नाठाळपणाला जणूं ऊत येतो. एरवी मनात कधीं आलें नसतें तें त्यावेळी नेमकें येतें. यासाठींच मनाला माकडाची उपमा दिली आहे. पण एकदां का मनाला गोडी लागली की मग तें रमते आणि स्थिरावते हा त्याचा गुणहि आहे. त्यासाठीं त्याला सामदामादींनी वरचेवर वळवीत राहावें, आवरीत राहावें.