गाडीवानानें गाडीला जुंपलेल्या बैलाला एकदां हाकावें आणि मग कासरा खाली ठेवून झोंपी जावे तसें जपादी कृत्यांचें होतें. खरे पाहता मनाला गोडी वाटावी, मन रमावे, नंतर ते एकाग्र व्हावें, स्थिर व्हावें असा उत्तरोत्तर वरचा वर्ग आहे. नुसती क्रिया करणें हा अगदीं बालवर्ग आहे. एकेका इयत्तेंत, त्यांतहि बालवर्गात किती वर्षे बसावयाचें त्याचा विचार गंभीरपणें करावयास नको कां?