मनबुद्धीचीं केंद्रे वरच्या पातळीवरचीं आहेत, सूक्ष्म आहेत. हाताची, डोळ्याची, जिभेची हालचाल ज्याच्यामुळे होतें तीं प्रेरक केंद्रे स्थूल आहेत, खालच्या पातळीवरचीं आहेत. या वेगळेपणामुळे मनाला वा बुद्धीला करीत असलेल्या कामांत रमविणें, एकाग्र करणे अवघड जातें.