कीर्तनांत झोप येणे हे चांगले लक्षण नाहीं. ही गोष्ट नकळत होते, अगतिकपणे होते. त्यांत झोंप घेणारांचा दोष आहेच; पण अशा झोंप घेणाराकडे पाहून झोंप न येणाऱ्या ज्या अन्य कुणाला उपहासानें हंसू येतें ते जास्त दोषी आहेत. कारण ते सावध आहेत आणि कीर्तनांत त्यांचे लक्षच नाहीं. ज्याला झोंप येते तो निदान दांभिक तरी नाहीं.