नैसर्गिक इच्छा पूर्ण कराव्यात, त्या दडपू नयेत, हे खरेच. पण जी जी इच्छा होते ती ती नैसर्गिकच आणि तिची पूर्ति झालीच पाहिजे हे मात्र केव्हांहि, कोणालाहि, कुठेहि न परवडणारे आहे.