माणसें संध्यादि कर्मे करतात. वडीलधाऱ्यांचा धाक म्हणून, रूढी म्हणून, परंपरा म्हणून, कांहींतरी देवाचें केलेलें असावें तें बरें म्हणून. संध्या वा तत्सम कृत्यें माणसें करतात, खरें म्हणजे उरकून टाकतात. पूजा-पाठ, स्तोत्रे-महात्म्यें वाचणें, देवाला जाऊन येणें इत्यादि हे सर्व घडतें पण तें बरें नसतें, एकनिष्ठेचे नसतें.