वस्तुस्थिती बाधक नसते, वस्तुस्थितिसंबंधी केल्या जाणाऱ्या कल्पना बाधक होतात. तत्त्वज्ञानानुसारी शास्त्रामध्ये यासाठीच सुखदुःखापेक्षां शोकमोहाला अधिक घातक मानले आहे, कारण त्यांचा जन्म कल्पनेतून होतो. परमार्थात प्रगति करूं इच्छिणारानें तिचा त्याग करावा.