कांही वेळा कर्तव्यबुद्धीने रागावणे आवश्यकहि असेल पण तो क्रोध आलेला असतां कामा नये, आणलेला असला पाहिजे. कारण कुणी रागवत नाही, संतापत नाही असे जर एकदा कळले तर त्या माणसाची जीवनात परवड झाल्याविना राहणार नाहीं. म्हणून संतापाच्या आधीन होऊ नये हें जितके खरे, तितकेच प्रसंगविशेषीं कर्तव्यबुद्धीने क्रोध आणता आला पाहिजे हेहि खरेंच.