सर्व दृष्टिने चांगले वागण्याचा उपदेश ऐकला म्हणजे माणसें म्हणतात- “आम्हीं आपले सामान्य. कुणी ज्ञानेश्वर-तुकाराम नाहीं लागून गेलो. आमचे वागणें असे आपले इतपतच असावयाचें, इ.” पण हें खरें नाहीं. प्रत्येक माणसाची चांगल्या वाईटाची जाण चांगली तीव्र असते, सूक्ष्महि असते.