36)आपल्या दुरावस्थेला कारणीभुत झालेला असंघटितपणा कोणत्या कारणांनी उत्पन्न झाला ? ही कारणे नाहिशी करण्यासाठी काय करावे ?

37)भारताची अस्मिता जागवावयाची, परंपरा जतन करावयाची म्हणजे काय ? न पटणाऱ्या रुढी, खोटया समजुती याही पाळाव्यात काय ?

38)चांगले-वाईट, उपकारक-अपकारक हे मुळातच परिस्थितीसापेक्ष असल्याने व हिंदू समाजाला वेळोवेळी निरनिराळया परिस्थतीतून जावे लागले असल्याने सकृतदर्शनी तरी अनेक परस्पर विरुध्द गोष्टींचा अदभुत संग्रह त्याचे ठिकाणी झाला आहे. त्या सर्वांमधून आजच्या परिस्थितीला योग्य अशा गोष्टींची निवड कशी करावी ? त्यासाठी निकष वा मानदंड कोणता लावावा ?

39)कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक असणारी विविधता (व्दैत) जोपासूनहि भावनात्मक अव्दैत कशामुळे होऊ शकेल ?

40)जन्माने वर्ण नेमणे व त्यामुळे पारंपारिक धंद्यातच रहावे लागणे हे योग्य आहे का ? त्यामुळे उद्योग-स्वातंत्र्य हिरावले जात नाही का ? जातीय भेद, चातुर्वर्ण्य आजच्या काळात योग्य आहे का ? त्यात दोष किंवा विकृति नाहीत का ? अस्पृश्यता , जातीय भेद हे त्यामुळेच निर्माण झालेले आहेत. अशा स्थितीत चातुर्वर्ण्य स्वीकारावेत का ? समाज जीवनाचे नियम (तत्वे) अपरिवर्तनीय व रचना परिवर्तनीय हे कसे व कोण ठरवणार?

41)चातुर्वर्ण्य आज विसकळित झाले आहेत ते पुन्हा कसे प्रस्थापित करता येतील ?

42)वर्णव्यवस्था किंवा मनुस्मृती यांच्यावर आक्षेप का घेतला जातो ? अस्पृश्यता, उच्चनीचता व तज्जन्य वैषम्याची भावना असेपर्यंत हिंदू संघटन कसे शक्य आहे ?संघटनेसाठी आंतरजातीय विवाह प्रशस्त मानावेत का ?

43)विविधतेला शरीराच्या अवयवांची आणि भावनात्मक एकतेला आत्म्याची उपमा देऊन त्यांच्या संयोगाप्रमाणे हे साधावे असे सांगितले जाते. पण्ं शरीराचे अवयव विचारशक्ती,भावना,विकार या सर्वांपासून मुक्त आहेत. यांचे उलट प्रत्येक व्यक्तीजवळ विचार-भावना-विकार या गोष्टी असतात. तेव्हा शरीर आणि आत्म्याप्रमाणे एकता कशी साधता येणार?

44)आर्थिक अडचणींमुळे नवीन वैज्ञानिक सुधारणा,शिक्षण यांस जुन्या कल्पना तोंड कसे देणार?

45)दैववादाकडून प्रयत्नवादाकडे आपल्या समाजाचे परिवर्तन शिक्षणांतून वा धर्मशिक्षयातून कसे घडवून आणता येईल? (‘संभवामि युगे युगे याचा अर्थ सांगून अवाताराची वाट पाहत वसावे काय’)