6)धर्म आणि तत्वज्ञान एकच काय ? वेगळे असतील तर त्यांचा परस्परसंबंध कोणत्या प्रकारचा असतो ?

7)हिंदू धर्माची अपरिवर्तनीय त्रिकालबाधित चिरस्थायी अशी तत्वे कोणती ? कालमान, परिस्थिती यांच्या अनुसार व्यवस्थेच्या व रचनेच्या स्वरुपामध्ये असलेली हिंदू़ धर्माची अंगे कोणती ?

8)कर्मविपाक, पुर्नजन्म, इश्वर मानणे हे हिंदु धर्माला आवश्यक आहे काय? हिंदूची व्याख्या व कसोटी कोणती ? सर्वांना समान आचार कोणता ? तो प्रथमपासून का नाही ?

9)हिंदू धर्माच्या तिन तत्वापैकी पुर्नजन्म व कर्म-विपाक ही अगदी स्वतंत्र आहेत काय?

10)हिंदु धर्म म्हणजे नेमके काय ? त्याचे पालन करण्याच्या किमान गोष्टी कोणत्या ?

11)हिंदू धर्म, हिंदू संस्कृती यांचे शिक्षण शैक्षणिक संस्थातुन दिले जावे असे अनेक जण म्हणतात त्याच्या किमान आराखडा काय असावा ?

12)कुटुंबात धार्मिक म्हणजे हिंदूत्वाचे वातावरण टिकविण्यासाठी किमान कोणते आचार – विचार पाळावेत व प्रौढ स्त्री-पुरुषांनी कोणत्या गोष्टी टाळाव्या ?

13)आजच्या काळात समाज-परिवर्तन म्हणजे काय ? विचार-आचार काय अभिप्रेत आहे ? लढाऊ समाज कसा उत्पन्न होईल ?

14)राजदंडापेक्षा धर्मदंड श्रेष्ठ असे हिंदू-तत्वज्ञान सांगते. ते आजच्याहि काळात योग्य व शक्य आहे काय?

15)हिंदू धर्मात नास्तिकालाही स्थान आहे हे योग्य आहे काय ? धर्मनिरपेक्ष राज्य हे हिंदू धर्माशी सुसंगत आहे काय ?