ॐ श्री 卐

ll श्रीशंकर ll

तावदेषा देवभाषा देवि स्थास्यति भूतले।
यावच्चवंशोsस्त्यार्याणां तावदेषा ध्रुवंध्रुवा।।

भावार्थ : ही देववाणी संस्कृतभाषा, या भूतलावर तोपर्यंत धृवपदासारखी (अढळ) अस्तित्वात राहील,
जोवर आर्यांचा (सभ्य-सुसंस्कृत लोकांचा) अखेरचा वंशज या भूतलावर असेल !

‘भाषासु मुख्या मधुरा, दिव्या गीर्वाणभारती l’ अशा देवभाषा संस्कृतवर पू. अप्पांचे अतिशय प्रेम होते. हिंदुस्थानचा परम उत्कर्षाचा काळ ज्या भाषेने अनुभवला, जी भाषा एकेकाळी भारताची बोलीभाषा होती, ती आज मरणासन्न अवस्थेत आहे, याचे पू. अप्पांना अतिशय दुःख होत असे. या देववाणीला पुन्हा वैभवी अवस्था प्राप्त व्हावी, अशी त्यांची खूप तळमळ होती. याच भावनेतून कैलासाश्रम, उत्तरकाशी व गणूदासाश्रम, गोरटे, येथे रोजच्या ‘करुणानिधे प्रभो’ या प्रार्थनेत भगवंताला आर्ततेने एक मागणे असते, ते असे…

भुविभूतसर्वभाषा परिपूरिताभिलाषा l
श्वसितीव देवभाषा, तां पालयस्व भगवन् ll

स्वामी वरदानंद भारती (पू. अप्पा) एखाद्या चिंतेच्या विषयावर केवळ उसासे टाकून नाराजी व्यक्त करणाऱ्यांपैकी नव्हते. “क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे” या समर्थ वाचनास प्रमाण मानून, अशा काळजीच्या विषयाच्या निराकरणासाठी आपल्या परीने सर्वतऱ्हेचे व होईल तितके जास्त प्रयत्न करण्याची त्यांनी नेहमीच दक्षता घेतली. त्या दृष्टीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत या विषयाची गोडी निर्माण व्हावी, या साठी शालान्त परीक्षेत संस्कृत या विषयात जास्तीत जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्याची योजना आखली.

या साठी शालान्त परीक्षेच्या पुणे व लातूर विभागांत “संस्कृत” विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्याचे निश्चित केले. श्री दासगणू महाराजांच्या पुण्यतिथीला म्हणजेच कार्तिक वद्य त्रयोदशीला हाहि पुरस्कार श्री दासगणू महाराजांच्याच स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान केला जातो. स्मृतिचिन्ह, श्रीफल व रोखरक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रु.२०००/- पासून सुरु झालेला हा पुरस्कार रु.५०००/- पर्यंत वाढवीत नेला आहे.

इ. स. १९९८ पासून खालील विद्यार्थ्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

अ. क्र. वर्ष
पुणे विभाग
लातूर विभाग
१९९८ अमेय विद्याधर गंभीर, पुणे आणि दीप्ती विनायक गंधे, पुणे आरती मधुकर पन्हीकर, लातूर
१९९९ श्रीशंकर रविशंकर बोडस, पुणे शंकर गंगाधर दापकेकर, लातूर
२००० सोनाली बबन जाधव, पुणे प्रवीण बसवप्पा दलाले, लातूर
२००१ सोनल अशोक इरोले, पुणे वैभवी चंद्रहार क्षीरसागर, लातूर
२००२ विशाल गौतम बोरा, पुणे अंकुश अशोक कालकोटे, लातूर
२००३ निशिता नंदकुमार बेके, पुणे ऋषिकेश आनंद देशपांडे, लातूर
२००४ पूजा अरविंद जोशी, पुणे विष्णु रामचंद्र माने, उमरगा
२००५ वैभव विठ्ठल गोरडे, राजगुरूरनगर कमलेश किशन सुवर्णकार, लातूर
२००६ श्रद्धा संजय मुनोत, अहिल्यानगर आदित्य अनंतराव जोशी, उदगीर
१० २००७ मुकुल विद्याधर बिवरे, पुणे शरयू रामभाऊ सूर्यवंशी, लातूर
११ २००८ प्रथमेश आनंद जाधव, पुणे सायली रुपसिंग सगर, लातूर
१२ २००९ अक्षय भीमराव चाटे, पुणे शिल्पा बसवराज हिरेमठ, उमरगा
१३ २०१० प्राजक्ता सुरेश ब्रह्मे, पुणे अंकिता शिवराज थोटे, उदगीर
१४ २०११ शैलेश विजयकुमार रुईकर, बारामती संजयकुमार धनंजय भोसले, लातूर
१५ २०१२ प्रसाद राम सरोदे, अहिल्यानगर मिताली मिलिंद कुलकर्णी, लातूर
१६ २०१३ कुणाल सतिश हाके, पुणे ज्ञानेश गोविंदराव डिग्गीकर, धाराशिव
१७ २०१४ प्रणाली मधुकर भोसले, पंढरपूर चारुशीला ब्रह्मानंद गिरी, नांदेड
१८ २०१५ कोमल कुंडलिक गवारे, बारामती पूजा अशोक लामदाडे, अहमदपूर
१९ २०१६ नरेश खुशालचंद धनवानी, बारामती आकांक्षा किशोर उबाळे, धाराशिव
२० २०१७ समृद्धी उमेश पुरोहित, पुणे अश्विनी भाऊसाहेब मुसळे, अहमदपूर
२१ २०१८ श्रुती श्रीराम कान्हूरकर, पुणे युगंधरा संजय देशमुख, लातूर
२२ २०१९ श्रुती विवेकानंद विभुते, सांगोला अभिषेक संतोष जाधव, लातूर
२३ २०२० श्रद्धा एकनाथ लगड, अहिल्यानगर आर्या अतुल सगर, उमरगा
२४ २०२१ ०५ पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने निवड केली नाही. ०५ पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने निवड केली नाही.
२५ २०२२ स्वराली संजय शित्रे, अहिल्यानगर प्रेरणा बालाजी कपाळे, उदगीर
२६ २०२३    – – आश्लेषा अनिल राऊत, मुरुड, ता. व जि. लातूर
२७      
२८      
२९      
३०      
३१      
३२      
३३      
३४      
३५      
३६      
३७      

स्वामी वरदानंद भारती (पू. अप्पा) यांची संस्कृत स्तोत्रे वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

https://sanskritdocuments.org/sanskrit/varadananda/