ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

पू. श्री दासगणू महाराजांचा जीवनपट

अ. क्र. घटना इसवी सन वय*
१) पौष शु. एकादशी शके १७८९ या तिथीला अकोळनेर, जि. नगर, येथे सहस्रबुद्धे यांच्या कुळात श्री.दत्तात्रेय व सौ.सावित्री यांच्या पोटी श्रीदासगणू महाराजांचा जन्म (१५१ वर्षे पूर्ण) ०६/०१/१८६८ प्रारंभ
२) मौंजी बंधन १८७७ ०९
३) शिक्षणास सुरुवात १८७८ १०
४) शिक्षणाचा त्याग व बडोद्याला नोकरी १८९० २२
५) विवाह – नोकरी त्याग – नगरला वापसी १८९२ २४
६) मानी स्वभावामुळे गृहत्याग; पोलिसात भरती – श्रीगोंदा येथे प्रथम नियुक्ती १८९३ २५
७) शिर्डीला श्रीसाईबाबांचे प्रथम दर्शन (१२५ वर्षे पूर्ण) १८९४ २६
८) सद्गुरु श्रीवामनशास्त्री इस्लामपूरकर यांची भेट व उपदेश (१२३ वर्षे पूर्ण) १८९६ २८
९) श्रीवामनशास्त्री काशीला रवाना व तिथेच ज्येष्ठ वद्य एकादशीला निर्वाण १८९७ २९
१०) जामखेडला बदली. तिथे स्वरचित कीर्तनाचा ओनामा व श्रीसाईबाबांच्या आदेशान्वये ओवीबद्ध संतचरित्रे लिखाणाचा श्रीगणेशा १८९७ २९
११) जीवनाला कलाटणी देणारे दरोडेखोर कान्ह्या भिल्लाचे प्रकरण १८९८ ३०
१२) श्रीसाईबाबांचा नोकरी सोडण्यासाठी तगादा १८९९ ३१
१३) जामखेडहून नेवासा येथे बदली १९०१ ३३
१४) नेवासा येथे मोहिनीराजाच्या मंदिरात शेवटचा तमाशा सादर करून रचलेल्या सर्व लावण्या जाळल्या १९०२ ३४
१५) पोलिसातील नोकरीचे त्यागपत्र (११६ वर्षे पूर्ण) १९०४ ३६
१६) श्रीसाईबाबांच्या आदेशान्वये मराठवाड्यातील नांदेडला आगमन (११३ वर्षे पूर्ण) १९०५ ३७
१७) मानसपुत्र श्री. दामोदर वामन आठवले यांची पुण्यात प्रथम भेट १९०७ ३९
१८) श्रीसाईबाबांच्या सांगण्यानुसार श्री.दामू अण्णा यांचा सौ.राधा (पू. अप्पांचे पिता-माता) यांचेशी विवाह. या विवाहास श्रीसाईबाबांची उपस्थिती होती (१०५ वर्षे पूर्ण) १९१४ ४६
१९) विजयादशमीला शिर्डीत श्रीसाईबाबांनी देह ठेवला (१०२ वर्षे पूर्ण)
१५/१०/१९१८ ५०
२०) शके १८४२ च्या अनंतचतुर्दशीला पू. अप्पांचा जन्म (९९ वर्षे पूर्ण) २७/०९/१९२० ५२
२१) श्रीसाईबाबा संस्थानची स्थापना; श्रीदासगणु महाराज प्रथम अध्यक्ष (९६ वर्षे पूर्ण)
१९२२ ५४
२२) मानसपुत्र श्री दामूअण्णांचे पंढरपुरात दुःखद निधन (९५ वर्षे पूर्ण)  १९२४ ५६
२३) लोणावळ्यात श्रीराम मंदिरात गंगादशहरा उत्सवास प्रारंभ १९३७ ६९
२४) घराघरात पोहंचलेला, शेगावच्या श्रीगजानन महाराजांच्या लीलाचरित्र वर्णन असलेला ‘श्रीगजाननविजय’ हा ग्रंथ लिहून पूर्ण (७९ वर्षे पूर्ण)
१९४० ७२
२५) गोरट्यात श्रीरुक्मिणीपांडुरंगाची स्थापना (६८ वर्षे पूर्ण) १९५१ ८३
२६) गोरट्यात श्रीशनिदेवाची स्थापना (६५ वर्षे पूर्ण) १९५४ ८६
२७) श्रीदासगणू महाराजांच्या इच्छेप्रमाणे श्रीसाईशरणानंद यांच्या हस्ते शिर्डीत श्रीसाईबाबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना; या निमित्त पू. अप्पांची चार दिवस कीर्तने झाली १९५४ ८६
२८) श्री.अनंत दामोदर आठवले (पू. अप्पा) यांनी लिहिलेला ‘श्रीदासगणू महाराज – व्यक्ती आणि वाङ्मय’ या ग्रंथाचे पुण्यात प्रकाशन १९५६ ८८
२९) श्रीदासगणू महाराजांनी आयुष्यातील एकमेव सत्कार नगर येथे स्वीकारला १९५८ ९०
३०) श्रीज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथीला (कार्तिक वद्य १३, १८८३) पंढरपुरात महानिर्वाण (५७ वर्षे पूर्ण)
२६/११/१९६२ ९४
*  श्री दासगणू महाराजांचे संबंधित घटनेच्या वेळी असलेले वय सुलभ संदर्भासाठी येथे नोंदविले आहे.