ॐ श्री 卐

ll श्रीशंकर ll

हिंदू राष्ट्र, हिंदू संस्कृति, वेद व आयुर्वेद हे पू. स्वामी वरदानंद भारती यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. धर्मकार्य, देशकार्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था यांना पाठबळ देण्यासाठी, त्यांनी घेतलेल्या निस्पृह कष्टाची, केलेल्या नि:स्वार्थ त्यागाची दखल घ्यावी व त्यांचे महनीय कार्य समाजापुढे यावे, या हेतूने श्रीदासगणू महाराजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “श्रीदासगणू पुरस्कार” प्रदान करण्याची योजना पू. अप्पांनी स्वतःच्या हयातीतच इ. स. १९९८ या वर्षी कार्यान्वित केली होती. श्रीदासगणू महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशीला श्रीदासगणू महाराजांनी पंढरपूरच्या ज्या वाड्यात आपला देह श्री पांडुरंगाच्या चरणी अर्पण केला, त्या त्यांच्या “दामोदराश्रम” येथेच हा पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम प्रतिवर्षी होत असतो.

रु.२५,०००/- पासून सुरू केलेला हा पुरस्कार सध्या रु. १,००,०००/- इतक्या रक्कमेपर्यंत वाढवीत नेला आहे. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफल व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

इ. स. १९९८ पासून आतापर्यंत खालील व्यक्ती/ संस्थांना “संतकवी श्रीदासगणू महाराज” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

अ. क्र. वर्ष पुरस्काराचे मानकरी
१९९८ प्रज्ञालोक (त्रैमासिक), नागपूर.
१९९९ धर्मभास्कर (मासिक), मुंबई.
२००० पाञ्चजन्य (साप्ताहिक), दिल्ली.
२००१ जनजाती विकास समिती, डीमापूर – नागालैंड आणि श्री. सुनील चिंचोलकर, पुणे.
२००२ डॉ. मु. श्री. कानडे, पुणे आणि डॉ. ज. द. जोगळेकर, मुंबई.
२००३ मसुराश्रम, गोरेगाव, मुंबई.
२००४ डॉ. ग. बा. पळसुले, पुणे.
२००५ श्री शिवप्रतिष्ठान–हिंदुस्तान, सांगली.
२००६ श्री गुरुदेव आश्रम, वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर, जि. नगर.
१० २००७ श्री. विक्रम नारायण सावरकर, मुंबई.
११ २००८ प्रा. श्रीनिवास माणिकराव कुलकर्णी, नागपूर.
१२ २००९ श्री. द्वा. वा. केळकर, पुणे.
१३ २०१० श्री सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान, ध. टाकळी, ता.पूर्णा, जि.परभणी.
१४ २०११ श्री एकनाथ संशोधन मंदीर, औरंगाबाद.
१५ २०१२ श्री समर्थ वाङ्देवता मंदिर, धुळे.
१६ २०१३ सौ. सुनिला हरि सोवनी, पुणे.
१७ २०१४ श्री हरि कीर्तनोत्तेजक सभा, पुणे.
१८ २०१५ श्री. जगन्नाथ चव्हाण, तळेगाव दाभाडे, जि. पुणे.
१९ २०१६ श्री. दिलीप वासुदेव आपटे, गीता फाउंडेशन, मिरज, जि. सांगली.
२० २०१७ श्री चतुर्वेदेश्वर धाम, सावरगाव, ता. परतूर, जि. जालना.
२१ २०१८ सांस्कृतिक वार्तापत्र (पाक्षिक), पुणे.

याच दिवशी संस्कृत भाषा संवर्धन पुरस्कारहि प्रदान केला जातो. या पुरस्कारामागची भूमिका व पुरस्कार्थींची नावे पाहण्यासाठी खालील link वर click करा.

Click Here